Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - गण. - गण. 21

गण. 21:20-30

Help us?
Click on verse(s) to share them!
20लोक बामोथाहून मवाबाच्या खोऱ्यात गेले. या जागी पिसगा पर्वताच्या उंच माथा वाळवंटाकडे जातो. पिसगा पर्वताच्या उंच माथ्यावरुन वाळवंट दिसते.
21इस्राएल लोकांनी काही माणसे अमोऱ्याचा राजा सीहोन याच्याकडे पाठवली. ते राजास म्हणाले,
22“आम्हास तुमच्या देशातून जाण्याची परवानगी द्या. आम्ही कोणत्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळयातून जाणार नाही. आम्ही तुमच्या कोणत्याही विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही केवळ राजामार्गवरुनच जाऊ.”
23पण सीहोन राजाने इस्राएल लोकांस त्याच्या देशातून जाण्याची परवानगी दिली नाही. राजाने आपले सैन्य गोळा केले आणि तो रानाकडे कूच करीत निघाला. तो इस्राएल लोकांबरोबर युद्ध करण्यासाठी निघाला होता. याहसला राजाच्या सैन्याने इस्राएल लोकांशी युद्ध केले.
24पण इस्राएलानी त्याच्यावर तलवार चालविली. नंतर त्यांनी आर्णोन आणि यब्बोक नद्यांच्या मधला प्रदेश घेतला. त्यांनी अम्मोनी लोकांच्या सरहद्दीपर्यंतचा प्रदेश घेतला, ते त्या सरहद्दीवर थांबले कारण अम्मोनी लोक तिचे रक्षण करीत होते.
25इस्राएल लोकांनी सगळी अमोऱ्यांची शहरे घेतली आणि तिथे रहायला सुरुवात केली. त्यांनी हेशबोन शहराचा व आजूबाजूच्या लहान शहरांचाही पराभव केला.
26हेशबोनामध्ये अमोऱ्यांचा राजा सीहोन राहत होता. पूर्वी सीहोनाने मवाबाच्या राजाशी युद्ध केले होते. सीहोनाने आर्णोन नदीपर्यंतचा प्रदेश घेतला होता.
27यावरुन ते म्हणीमध्ये बोलतात; ते म्हणतात, हेशबोनाला या. पुन्हा सीहोनाचे शहर बांधू द्या, त्याची स्थापना होऊ द्या.
28हेशबोनामधून आग निघाली आहे, ज्वाला सीहोनाच्या शहरातून निघाली आहे. त्या आगीत मवाबामधले आर शहर बेचीराख झाले. आणि आर्णोनेच्या गढ्याचे स्वामी भस्म करून टाकले आहेत.
29हे मवाबा! तू हायहाय करशील, कमोशाचे लोक नष्ट झाले. त्याची मुले पळून गेली. त्याच्या मुलींना अमोऱ्याचा राजा सीहोन याने कैद करून पकडून नेले.
30पण आम्ही सीहोन जिंकले आहे. दीबोनापर्यंत हेशबोन सर्व नष्ट झाले आहे. आम्ही नोफा जे मेदबाजवळ पोहचते तेथपर्यंत त्यांचा सर्व पराभव केला आहे.

Read गण. 21गण. 21
Compare गण. 21:20-30गण. 21:20-30