Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - गण. - गण. 20

गण. 20:7-20

Help us?
Click on verse(s) to share them!
7परमेश्वर मोशेशी बोलला आणि म्हणाला,
8तुझी काठी घे. तुझा भाऊ अहरोन याला आणि त्या लोकांस बरोबर घे आणि खडकाजवळ जा. लोकांसमोर खडकाशी बोल. नंतर त्या खडकातून पाणी वाहू लागेल आणि तू ते पाणी त्या लोकांस आणि त्यांच्या जनावराना देऊ शकशील.
9मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे परमेश्वरापुढून त्याने काठी घेतली.
10मोशे आणि अहरोन यांनी लोकांस त्या खडकासमोर भेटायला सांगितले. नंतर मोशे म्हणाला, अहो, तुम्ही बंडखोरांनो ऐका. तुम्हासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावयाचे काय?
11मोशेने आपला हात वर उचलला आणि काठीने खडकावर दोन वार केले. खडकातून पाणी बाहेर वाहू लागले आणि माणसे व जनावरे ते पाणी पिऊ लागली.
12पण परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. इस्राएली लोकांपुढे तुम्ही माझे पावित्र्य राखले नाही. मी वचन दिल्याप्रमाणे या मंडळीला जो देश दिला आहे ह्याना त्या देशात तुम्ही त्यांना तिथे घेऊन जाणार नाही.
13त्या जागेला मरीबा असे नांव पडले. इस्राएल लोकांनी परमेश्वराबरोबर जिथे वाद घातला तीच ती जागा होती. याच जागेवर परमेश्वराने त्यांना तो किती पवित्र आहे ते दाखवले होते.
14मोशे कादेशला होता तेव्हा त्याने अदोमाच्या राजाकडे काही लोकांस एक निरोप देऊन पाठवले. तो निरोप होता, तुझे भाऊ, इस्राएलचे लोक तुला म्हणतात, आमच्यावर जी जी संकटे आली त्याबद्दल तुला माहिती आहेच.
15खूप वर्षापूर्वी आमचे पूर्वज मिसर देशात गेले. आणि तिथे आम्ही अनेक वर्षे राहिलो. मिसर देशाचे लोक आमच्याशी फार दुष्टपणे वागले.
16पण आम्ही परमेश्वराकडे आरोळी केली. त्याने आमची वाणी ऐकली आणि आमच्या मदतीसाठी देवदूताला पाठवले आणि आम्हास मिसर देशातून बाहेर आणले. तर आता पाहा आम्ही तुझ्या देशाच्या सीमेच्या अगदी शेवटास असलेल्या कादेशमध्ये आलो आहोत.
17कृपाकरून आम्हास तुझ्या प्रदेशातून जाऊ दे. आम्ही कोठल्याही शेतातून वा द्राक्षाच्या मळ्यातून जाणार नाही. आम्ही तुझ्या विहिरीचे पाणी पिणार नाही. आम्ही राजरस्त्यांच्या बाजूने फक्त जाऊ. आम्ही रस्ता सोडून डावीकडे अथवा उजवीकडे वळणार नाही. तुझ्या देशातून बाहेर येईपर्यंत आम्ही रस्त्यावरच राहू.
18परंतु अदोमाच्या राजाने उत्तर दिले, तुम्ही आमच्या देशातून जाणार नाही. जर तुम्ही आमच्या देशातून जायचा प्रयत्न केला तर आम्ही येऊन तुमच्याशी तलवारीने युद्ध करु.
19इस्राएल लोकांनी उत्तर दिले, आम्ही मुख्य रस्त्यावरुन जाऊ. जर आमची जनावरे तुमचे पाणी प्यायले तर आम्ही तुम्हास त्याचा मोबदला देऊ. आम्हास फक्त तुमच्या देशातून जायचे आहे. आम्हास तो प्रदेश आमच्यासाठी घ्यायची इच्छा नाही.
20पण अदोमाने पुन्हा उत्तर दिले, आम्ही तुम्हास आमच्या देशातून जाण्याची परवानगी देणार नाही. नंतर अदोमाच्या राजाने मोठी आणि शक्तीशाली सेना गोळा केली आणि तो इस्राएल लोकांशी लढावयास गेला.

Read गण. 20गण. 20
Compare गण. 20:7-20गण. 20:7-20