Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - गण. - गण. 16

गण. 16:6-22

Help us?
Click on verse(s) to share them!
6म्हणून कोरह तू आणि तुझ्या गटाने धुपाटणे आणा.
7उद्या अग्नी आणि धूप काही खास भांड्यात ठेवा. नंतर ती भांडी परमेश्वरासमोर आणा. खरोखरच जो पवित्र असेल त्याची परमेश्वर निवड करील. लेवीच्या वंशजांनो तुम्ही फार पुढे गेलात. तुम्ही चूक केलीत.”
8मोशे कोरहाला आणखी म्हणाला, “लेवीच्या वंशजांनो तुम्ही माझे ऐका
9तुमची निवड इस्राएलच्या देवाने केली आहे आणि तुम्हास खास दर्जा दिला आहे म्हणून तुम्ही आनंदी असायला हवे. तुम्ही इस्राएलच्या इतर लोकांपेक्षा वेगळे आहात. परमेश्वराने तुम्हास खास कामासाठी, इस्राएल लोकांस परमेश्वराची भक्ती करायला मदत व्हावी म्हणून त्याच्या पवित्र निवासमंडपात त्याच्याजवळ आणले. हे पुरेसे नाही का?
10परमेश्वराने लेवीच्या वंशजांना याजकांच्या मदतीसाठी जवळ आणले. परंतु आता तुम्हीच याजक होण्याची वेळ प्रयत्न करीत आहात.
11तुम्ही आणि तुमचे अनुयायी एकत्र आलात आणि परमेश्वराच्या विरूद्ध गेलात. अहरोनाने काही चूक केली का? नाही. मग तुम्ही अहरोनाविरूद्ध का तक्रार करीत आहात.”
12नंतर मोशेने दाथान, अबीराम, या अलीयाबाच्या मुलांना बोलावले पण ते दोघे म्हणाले, आम्ही येणार नाही.
13तू आम्हास रानात जिवे मारावे म्हणून दूध व मध वाहण्याच्या देशातून काढून वर आणले आहेस हे काय थोडे आहे. आणि आता आमच्यावर तुझी अधिक सत्ता आहे हे तुला दाखवायचे आहे.
14आणखी तू आम्हास दूध व मध वाहण्याच्या देशात आणले नाही आणि आम्हास शेताचे व द्राक्षमळ्याचे वतन दिले नाही. आता तू पोकळ वचने देऊन आमचे डोळे आंधळे करीत आहेस काय? आम्ही तुझ्याकडे येणार नाही.
15म्हणून मोशेला खूप राग आला. तो परमेश्वरास म्हणाला, “मी या लोकांच्या बाबतीत काहीही वाईट केले नाही. मी त्यांच्याकडून एक गाढव देखील घेतले नाही! आणि मी कोणाचेही वाईट केले नाही.
16नंतर मोशे कोरहाला म्हणाला, उद्या तू आणि तुझे अनुयायी परमेश्वरापुढे उभे राहतील. तिथे तू अहरोन आणि तुझे अनुयायी असतील.
17तुम्ही प्रत्येकाने एक भांडे आणावे त्यामध्ये धूप टाकावा आणि ते परमेश्वरास द्यावे. नेत्यांसाठी अडीचशे भांडी असतील आणि एकेक भांडे तुझ्यासाठी व अहरोनासाठी असेल.”
18म्हणून प्रत्येकाने भांडे आणले आणि त्यामध्ये उद धूप जाळला, नंतर ते दर्शनमंडपाच्या दारात उभे राहिले. मोशे आणि अहरोनसुद्धा तिथे उभे राहिले.
19कोरहानेसुद्धा त्याच्याविरुध्द दर्शनमंडपाच्या दारापाशी सर्व लोक जमा केले. नंतर प्रत्येकाला परमेश्वराचे तेज दिसले.
20परमेश्वर मोशेला आणि अहरोनाला म्हणाला,
21या लोकांपासून दूर जा. मला आता त्यांचा नाश करायचा आहे.
22पण मोशे आणि अहरोन जमिनीवर पालथे पडले आणि ओरडले, हे देवा सर्व देहधारी आत्म्यांच्या, देवा! फक्त एका मनुष्याने पाप केले आहे! म्हणून सर्व मंडळीवर रागावू नकोस.

Read गण. 16गण. 16
Compare गण. 16:6-22गण. 16:6-22