Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - गण. - गण. 14

गण. 14:7-21

Help us?
Click on verse(s) to share them!
7ते इस्राएल लोकांच्या सर्व मंडळीशी बोलले. ते म्हणाले, आम्ही जो देश हेरायला येथून तेथे फिरलो तो देश खूप चांगला आहे.
8जर परमेश्वर आपल्यावर प्रसन्न झाला तर तो आपल्याला त्या देशात नेईल आणि तो दूध व मध वाहणारा देश आपल्याला देईल.
9“परंतु परमेश्वराविरूद्ध बंड करू नका आणि त्या देशातल्या लोकांची भीती बाळगू नका. आपल्या अन्नाप्रमाणे आपण त्यांना सहज भक्ष्य करू. त्यांचे संरक्षण त्यांच्यापासून काढले जाईल, कारण परमेश्वर आमच्याबरोबर आहे. त्यांना घाबरु नका.”
10पण सर्व मंडळी म्हणू लागली त्यांना दगडमार करा. परंतु परमेश्वराचे तेज दर्शनमंडपावर इस्राएल लोकांस दिसले.
11परमेश्वर मोशेला म्हणाला, “हे लोक कोठवर मला तुच्छ लेखतील? ह्यांच्यामध्ये मी केलेली शक्तीशाली चिन्हे पाहूनही त्याची पर्वा न करता माझ्यावर विश्वास ठेवण्यास चुकत आहेत.
12मी त्यांना मरीने मारून टाकीन. मी त्यांचा वारसा हक्क काढून घेईल, आणि मी तुझ्या स्वतःच्या कुळापासून त्यांच्यापेक्षा मोठे व सामर्थ्यशाली राष्ट्र करीन.”
13मोशे परमेश्वरास म्हणाला, जर तू असे केलेस तर ते मिसरी लोक ऐकतील कारण तू आपल्या सामर्थ्याने या लोकांस बाहेर आणले.
14ते त्या देशातल्या राहणाऱ्यांना हे सांगतील, त्यांनी ऐकले आहे की तू परमेश्वर या लोकांच्या मध्ये आहेस, कारण तू परमेश्वर प्रत्यक्ष दिसत आहेस तुझा ढग त्यांच्यावरती उभा राहतो, आणि दिवसा ढगाच्या खांबात रात्री त्या ढगाचा अग्नीच्या खांबात तू त्यांच्यापुढे चालतोस.
15आता जर तू या लोकांस एका मनुष्याप्रमाणे मारले, तर ज्या राष्ट्रांनी तुझी किर्ती ऐकली आहे ते बोलतील आणि म्हणतील,
16परमेश्वराने त्यांना जो देश देण्याचे शपथपूर्वक सांगितले होते त्यामध्ये तो आणू शकला नाही म्हणून त्याने त्यांना रानात मारून टाकले.
17“म्हणून आता मी विनंती करतो, तुझ्या महान सामर्थ्याचा उपयोग कर. तू, म्हणाला होतास,
18परमेश्वर रागवायला मंद आहे आणि विपुल दयेने भरलेला आहे. तो अपराधांची व अधर्माची क्षमा करतो पण जे लोक अपराधी आहेत त्यांची मुळीच गय करत नाही. तो पूर्वजांच्या पापाबद्दल त्यांच्या वंशजाच्या तिसऱ्या व चौथ्या पिढीवर वडिलांच्या अन्यायाची शिक्षा लेकरांना करतो.
19मी तुला विनंती करतो, तुझ्या महान विश्वसनीयतेच्या कराराने त्यांच्या पापांची क्षमा कर. त्यांनी मिसर सोडल्यापासून आतापर्यंत तू जसा त्यांना क्षमा करीत आला आहेत तशीच आताही त्यांना क्षमा कर.”
20परमेश्वर म्हणाला, “तू विनंती केल्याप्रमाणे मी त्यांना क्षमा केली आहे.”
21पण खचित जसा मी जिवंत आहे आणि सारी पृथ्वी परमेश्वराच्या वैभवाने भरलेली आहे.

Read गण. 14गण. 14
Compare गण. 14:7-21गण. 14:7-21