Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - गण. - गण. 14

गण. 14:29-36

Help us?
Click on verse(s) to share them!
29तुमची प्रेते या रानात पडतील. तुमच्यापैकी ज्यांची गणना झाली त्यांच्या पूर्ण संख्येतील वीस वर्षांचा किंवा त्याहून अधिक वयाचे ज्यांनी माझ्याविरूद्ध कुरकुरले,
30ज्या देशात तुमचे घर देण्याचे वचन मी तुम्हास दिले त्यामध्ये तुमच्यापैकी कोणीही जाणार नाही. फक्त यफुन्नेचा मुलगा कालेब आणि नूनाचा मुलगा यहोशवा जातील.
31ज्या तुमच्या मुलाबाळाविषयी तुम्ही म्हणाला की, त्यांची लूट होईल. मी त्यांना त्या देशात नेईल. तुम्ही जो देश नाकारला तो देश ते अनुभवतील.
32आणि तुमच्याविषयी तर तुमची प्रेते या रानात पडतील.
33तुमची प्रेते या रानात नष्ट होईपर्यंत चाळीस वर्षे तुमची मुलेबाळे तुम्ही केलेल्या विश्वासघाताची शिक्षा भोगीत रानात भटकणारी होतील.
34तुम्हास तुमच्या पापाबद्दल चाळीस वर्षे दु:ख भोगावे लागेल. त्या मनुष्यांना तो प्रदेश शोधायला चाळीस दिवस लागले. त्या प्रत्येक दिवसासाठी एक वर्ष मी तुमच्या विरोधात असणे ही किती भयानक गोष्ट आहे हे तुम्हास समजेल.
35“मी परमेश्वर आहे आणि मी बोललो आहे. मी वचन देतो की या दुष्ट मनुष्यांना मी या सर्व गोष्टी करीन. माझ्याविरूद्ध जाण्यासाठी ते लोक एकत्र आले म्हणून ते सर्व या रानात मरतील.”
36मोशेने ज्या लोकांस नवीन प्रदेश शोधण्यासाठी पाठवले होते त्याच लोकांनी परत येऊन इस्राएल लोकांमध्ये तक्रारी पसरावयाला सुरुवात केली. ते लोक म्हणाले की त्या प्रदेशात जाण्याइतके आपले लोक शक्तीवान नाहीत.

Read गण. 14गण. 14
Compare गण. 14:29-36गण. 14:29-36