Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - गण. - गण. 13

गण. 13:4-24

Help us?
Click on verse(s) to share them!
4त्यांची नांवे अशी आहेत:रऊबेन वंशातला जक्कुराचा मुलगा शम्मुवा.
5शिमोन वंशातला होरीचा मुलगा शाफाट.
6यहूदा वंशातला यफुन्नेचा मुलगा कालेब.
7इस्साखार वंशातला योसेफाचा मुलगा इगाल.
8एफ्राईम वंशातला नूनाचा मुलगा होशा.
9बन्यामीन वंशातला राफूचा मुलगा पलटी,
10जबुलून वंशातला सोदीचा मुलगा गद्दीयेल,
11योसेफ वंशातला (मनश्शे) सूसीचा मुलगा गद्दी,
12दान वंशातला गमल्लीचा मुलगा अम्मीयेल.
13आशेर वंशातला मीकाएलाचा मुलगा सतूर,
14नफताली वंशातला बाप्सीचा मुलगा नहब्बी.
15आणि गाद वंशातला माकीचा मुलगा गऊवेल.
16मोशेने देश हेरावयास पाठवलेल्या लोकांची ही नांवे होती. (मोशेने नूनाचा मुलगा होशा ह्याचे नांव यहोशवा असे ठेवले.)
17मोशेने कनान देश हेरण्यास पाठवताना लोकांस सांगितले की तुम्ही येथून नेगेब प्रांतामधून निघा आणि मग डोंगराळ प्रदेशात जा.
18देश कसा आहे? तेथील लोक कसे आहेत! ते बलवान आहेत किंवा दुबळे आहेत? ते थोडे आहेत किंवा फार आहेत? ते पाहा व समजून घ्या.
19ते राहतात तो देश कसा आहे? तो चांगला आहे किंवा वाईट आहे? ते लोक कशा प्रकारच्या नगरात राहतात? संरक्षणासाठी त्या नगरांभोवती कोट आहेत का? त्या नगरांची संरक्षण व्यवस्था बलवान आहे का? या सर्व गोष्टी पाहा व समजून घ्या. तेथील जमीन पीक घेण्यास
20योग्य आहे का? त्या प्रदेशात झाडे आहेत का? तेथील काही फळे बरोबर घेऊन या. ते दिवस द्राक्षाच्या पहिल्या बहराचे होते.
21म्हणून ते तो प्रदेश शोधायला निघाले. त्यांनी सीन रानापासून रहोब आणि लेबो हमाथपर्यंतच्या प्रदेशात शोध घेतला.
22त्यांनी नेगेबमधून त्या प्रदेशात प्रवेश केला आणि ते हेब्रोनला गेले. हेब्रोन शहर मिसर देशातल्या सोअन शहराच्या सात वर्षे आधी बांधले होते. अहीमान शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज तेथे राहत होते.
23नंतर ते लोक अष्कोलच्या खोऱ्यात गेले. तेथे त्यांनी द्राक्षाच्या वेलीची एक फांदी तोडली. त्या फांदीला द्राक्षाचा घोसासहीत त्यांनी ती फांदी एका खांबावर ठेवली आणि दोघेजण ती आपल्या मधोमध ठेवून घेऊन गेले. त्यांनी बरोबर काही डाळिंबे व अंजीर ही घेतली.
24त्या जागेला अष्कोल खोरे असे म्हणतात कारण तिथे इस्राएल लोकांनी द्राक्षाचा घड तोडला होता.

Read गण. 13गण. 13
Compare गण. 13:4-24गण. 13:4-24