Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - गण. - गण. 11

गण. 11:13-25

Help us?
Click on verse(s) to share them!
13एवढ्या लोकांस पुरेल एवढे मांस देण्यासाठी मी कोठे शोधू? ते माझ्याकडे आसवे गाळून रडत आहेत, ते म्हणतात आम्हास खावयास मांस दे!
14मी एकटा या सर्वांची काळजी घेऊ शकत नाही. हे माझ्यासाठी फारच जड आहे.
15जर तू मला अशा मार्गाने वागवतोस, तुझी दया माझ्यावर असल्यास मला आता मारुन टाक आणि माझे दुःख दूर कर.
16परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्राएलाच्या वडिलांचे सत्तर मनुष्ये मजकडे आण. मंडळीचे नेते असलेल्या या लोकांस दर्शनमंडपाच्या दारापाशी आण; व तुझ्याबरोबर त्यांना उभे कर.
17मग मी खाली येऊन तेथे तुझ्याशी बोलेन. मग तुझ्यावर असलेल्या आत्म्यातून काही भाग मी त्यांनाही देईन. मग लोकांची काळजी घेण्यास ते तुला मदत करतील. ह्याप्रकारे इस्राएल लोकांची जबाबदारी केवळ तुझ्या एकट्यावर राहणार नाही.
18लोकांस सांग उद्या तुम्ही स्वत: शुद्ध राहा म्हणजे तुम्हास मांस खावयास मिळेल. परमेश्वराने तुमचे रडगाणे ऐकले आहे. आम्हास मांस खाण्यास पाहिजे! आम्ही मिसरमध्ये होतो ते बरे होते, असे तुम्ही म्हणाला ते शब्दही परमेश्वराने ऐकले आहेत. तेव्हा आता परमेश्वर तुम्हास मांस देईल आणि तुम्ही ते खाल.
19तुम्ही ते एक, किंवा दोन, किंवा पाच, किंवा दहा दिवस, वीस दिवसच नाही तर,
20परंतु तुम्ही ते पूर्ण महिनाभर तुमच्या नाकपुड्यातून निघेपर्यंत आणि तुम्हास शिसारी येईपर्यंत तुम्ही ते खाल. कारण तुम्ही जो परमेश्वर तुम्हामध्ये राहतो त्यास तुम्ही नाकारले आहे. तुम्ही त्याच्यासमोर रडला. तुम्ही म्हणाला, आम्ही मिसर देश का सोडला?
21नंतर मोशे म्हणाला, परमेश्वरा येथे सहा लाख लोक आहेत आणि तू म्हणतोस की, ह्याना पूर्ण महिनाभर पुरेल एवढे मांस मी खावयास देईन!
22आम्ही त्यांना तृप्त करावे म्हणून शेरडेमेंढरे व गुरेढोर कापावीत काय? किंवा समुद्रातील सर्व मासे त्यांच्यासाठी गोळा करून आणावे काय?
23परमेश्वर मोशेला म्हणाला, “माझा हात तोकडा आहे काय? आता माझे शब्द खरे आहेत की नाही हे तू पाहशील.”
24मोशे बाहेर गेला आणि परमेश्वर जे बोलला ते लोकांस सांगितले. मग मोशेने मंडळीच्या सत्तर वडिलांना एकत्र जमविले आणि त्याने त्यांना तंबू सभोवती उभे केले.
25मग परमेश्वर ढगात उतरून आला आणि मोशेशी बोलला. मोशेवर परमेश्वराचा आत्मा होता. त्यातून काही घेऊन परमेश्वराने ते त्या सत्तर वडिलावर ठेवला. तो आत्मा आल्यावर ते संदेश सांगू लागले. परंतु त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा संदेश सांगितला नाही.

Read गण. 11गण. 11
Compare गण. 11:13-25गण. 11:13-25