Text copied!
CopyCompare
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी - उप. - उप. 5

उप. 5:10-19

Help us?
Click on verse(s) to share them!
10जो रुप्यावर प्रेम करतो तो रुप्याने समाधानी होत नाही. आणि जो संपत्तीवर प्रेम करतो त्यास नेहमीच अधिक हाव असते. हे सुद्धा व्यर्थ आहे.
11जशी समृद्धी वाढते, तर तिचे खाणारेही वाढतात. आपल्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय तेथे मालकाला संपत्तीत काय लाभ आहे?
12काम करणाऱ्या मनुष्याची झोप गोड असते, तो थोडे खावो किंवा अधिक खावो, पण श्रीमंत मनुष्याची संपत्ती त्यास चांगली झोप येऊ देत नाही.
13जे मी भूतलावर पाहिले असे एक मोठे अरिष्ट आहे, ते म्हणजे धन्याने आपल्या अहितास आपले राखून ठेवलेले धन होय.
14जेव्हा श्रीमंत मनुष्य आपले धन अनिष्ट प्रसंगामुळे गमावतो, त्यामुळे त्याच्या स्वतःच्या मुलाला, ज्याला त्याने वाढवले आहे, त्यास द्यायला त्याच्या हातात काहीही राहत नाही.
15जसा मनुष्य आपल्या आईच्या उदरातून नग्न जन्मला, जसा तो आला तसाच, तो नग्न परत जाईल. आपल्या कामापासून आपल्या हातात काहीही घेऊन जाऊ शकत नाही.
16दुसरे एक मोठे अरिष्टच आहे तो जसा आला तसाच सर्वतोपरी परत जाईल, म्हणून जो कोणी वायफळ काम करतो त्यास काय लाभ मिळतो?
17तो त्याच्या आयुष्यभर अंधारात अन्न खातो आणि खिन्नतेने शेवटी तो आजारी आणि रागीट बनतो.
18मी पाहिले आहे ते पाहा; मनुष्याने खावे, प्यावे आणि देवाने त्याचे जे आयुष्य त्यास दिले आहे त्यातील सर्व दिवस तो ज्या उद्योगात भूतलावर श्रम करतो त्यामध्ये सुख भोगावे हे चांगले आणि मनोरम आहे, हे मनुष्यास नेमून दिलेले काम आहे.
19जर देवाने एखाद्याला संपत्ती, मालमत्ता आणि या गोष्टींचा उपभोग घेण्याची शक्ती दिली असेल तर त्याने त्याचा उपभोग घेतला पाहिजे. त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांचा स्विकार त्याने केला पाहिजे, आणि त्याचे कामही आनंदाने केले पाहिजे. ती देवाने दिलेली भेट आहे.

Read उप. 5उप. 5
Compare उप. 5:10-19उप. 5:10-19